Breaking News

पनवेलच्या अबोली महिला रिक्षा चालक संघटनेची घौडदौड

सातव्या शाखेचे लवकरच उद्घाटन

पनवेल : वार्ताहर

पनवेल येथील अबोली महिला रिक्षा चालक संघटनेची घौडदौड सुरुच आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांच्या प्रयत्नांनी जास्तीत जास्त महिला या संघटनेशी जोडल्या जात असून आता संघटनेची सातवी शाखा बदलापूर येथे लवकरात लवकर स्थापन होणार आहे.

बदलापूरच्या संघटनेत 17 सदस्य असून यामध्ये आणखी वाढ होताना दिसत आहे. कल्याण शाखेमध्ये महिलांची संख्या वाढत असून येथील महिलांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यासाठी कल्याण विभागाच्या उपाध्यक्षापदी प्रिया व्हावळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी पनवेल, कळंबोली, कर्जत, खालापूर, कोपरखैरणे, कल्याण नंतर आता बदलापूर येथे सातव्या शाखेचे लवकरात लवकर उद्घाटन करण्यात करण्यात येणार आहे. या वेळी उपस्थित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत व साप्ताहिक रायगड पनवेलचे कार्यकारी संपादक मनोहर पाटील, कल्याण विभागाचे  उपाध्यक्ष प्रिया ओव्हळ, सदस्य आरती पवार व बदलापूर येथील रिक्षा चालक महिला उपस्थित होते.

संघटनेतर्फे महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात आणि त्यामुळे या संघटनेला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणाहून संघटना स्थापण्यासाठी विचारणा होत असून लवकरच आणखी काही ठिकाणी शाखा स्थापन होणार आहेत.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply