नेरळमध्ये अभिवादन
कर्जत : बातमीदार
नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (दि. 19) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
सरपंच रावजी शिंगवा यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, राजन लोभी, अतुल चंचे, नितीन निर्गुडा, सदस्या पार्वती पवार, श्रद्धा कराळे, शिवाली पोतदार, रेणुका चंचे, उषा पारधी आणि ग्रामविकास अधिकारी सुळ यांच्यासह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
नागोठण्यात शिवपुतळ्याचे पूजन
नागोठणे : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांची 391वी जयंती नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवलयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जि.प.सदस्य किशोर जैन आणि सरपंच डॉ. मिलिंद धात्रक तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन करण्यात आले.
उपसरपंच सुरेश जैन, ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, सुप्रिया महाडिक, भक्ती जाधव, ज्ञानेश्वर साळुंके, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांच्यासह कनिक्ष धात्रक, अरुण भोईर, पांडुरंग कोळी, संतोष जोशी, प्रमोद चोरगे, भास्कर घाग, राजू नागोठणेकर, वैभव चितळकर, अशोक गोरे, हरेश शिर्के, चंद्रकांत ताडकर, हिम्मत जाधव आदी या वेळी उपस्थित होते.
शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिकेे
पाली : प्रतिनिधी
शिवजयंतीचे औचित्य साधून सुधागड तालुक्यातील शिळोशी येथील जय हनुमान आखाडा तर्फे पालीतील मराठा समाज सभागृहासमोर शुक्रवारी (दि.19) सायंकाळी शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके व चित्तथरारक खेळ सादर करण्यात आले. ही प्रात्यक्षिके पाहून उपस्थित भारावून गेले होते. या वेळी शिवऋण प्रतिष्ठान, तहसील व नगरपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
सुधागड पालीत जनसेवा मोहीम
पाली : प्रतिनिधी
शिवजयंती निमित्त येथील तहसील व नगरपंचायत कार्यालय तसेच शिवऋण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजना जनसेवा मोहीम राबविण्यात आली. पालीतील आगरी समाज मैदानावर 17 ते 19फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.
सुधागड तालुक्यातील जनतेला विविध योजना व दाखले सुलभतेने एकाच ठिकाणी मिळावेत व त्यांची फरफट थांबावी या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. या वेळी 70जातीचे दाखले, 840 आधार कार्ड नोंदणी व समस्या निवारण, 55नवीन मतदार नोंदणी, 150पॅनकार्ड, 45पेन्शन योजना लाभार्थी, 22नवीन रेशन कार्ड, 70रेशनकार्ड दुरुस्ती आदींचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यात आला. तसेच किसान क्रेडीटकार्ड व कृषी योजना सल्लाही देण्यात आला.
तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेली ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शिवऋण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल मोरे व उपाध्यक्ष केतन म्हसके यांच्यासह सरकारी अधिकारी, कर्मचारी व प्रतिष्ठानचे 50हुन अधिक सदस्यांनी मेहनत घेतली.
कर्जत चांधई येथे शिवजयंती जल्लोषात
कर्जत : बातमीदार
तालुक्यातील लहान चांधई येथे ग्रामस्थ आणि हुतात्मा हिराजी पाटील तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी हुतात्मा भाई कोतवाल यांची भाची शोभना कुट्टी यांना शिवपुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान चांधई येथे गेल्या 15वर्षापासून शिवजयंती साजरी करण्यात येते. या वेळी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त वेच्या गावित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात शिवव्याख्याते प्रमोद पाटील यांनी शिवराय व त्यांचे क्रांतिकार्य या विषयावर माहिती दिली. या वेळी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत दर्शन म्हात्रे (रा. चांधई) याने प्रथम क्रमांक पटकवला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कोळंबे यांनी, तर सूत्रसंचालन नंदकुमार कोळंबे यांनी केले. जि.प. सदस्या सहाराताई कोळंबे, ओबीसी महासभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष भगवान धुळे, तसेच विजय कोंडीलकर, अनिल भोसले, संतोष कोळंबे, श्रीकांत हावरे, महेश कोळंबे राणे, चित्ते यांच्यासह शिवप्रेमी ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष कोळंबे, शिवाजी कोळंबे, दत्तात्रेय कोळंबे, देविदास कोळंबे कोळंबे, सदानंद कोळंबे, जयेश कोळंबे यांनी विशेष मेहनत घेतली.