पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने नववी राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित आयोजित करण्यात आली आहे.
नाट्यचळवळ वृद्धिंगत व्हावी, नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे व त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा अविरतपणे पुढे चालत रहावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला.
नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व नेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आला आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी 4 व 5 नोव्हेंबर रोजी पुणे येथे, 6 नोव्हेंबर सातारा, 8 नोव्हेंबर रत्नागिरी, 12 नोव्हेंबर जळगाव/नागपूर, 13 नोव्हेंबर नाशिक, 19 व 20 नोव्हेंबर रायगडसाठी पनवेल खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालय येथे आणि 25, 26, 27 नोव्हेंबर रोजी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसाठीही सीकेटी महाविद्यालय येथे होणार आहे, तर अंतिम फेरी 3, 3 व 4 डिसेंबर रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत रंगणार आहे.
प्रवेशासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर आहे. विजेत्या एकांकिका तसेच वैयक्तिक कलागुणांना रोख रक्कम, चषक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी अमोल खेर (9820233349), गणेश जगताप (9870116964) किंवा निखिल गोरे (8097248877) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …