Breaking News

काँग्रेसच्या जनआक्रोश रॅलीच्या मंचावर डान्सरने लगावले ठुमके; व्हिडीओ व्हायरल

रांची : वृत्तसंस्था

गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे काँग्रेसकडून समर्थन करण्यात आले आहे, मात्र झारखंडमधील सरायकेला-खरसावो जिल्ह्यात काँग्रेसतर्फे शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ आयोजित जनआक्रोश रॅलीत चक्क एका डान्सरचे ठुमके पाहावयास मिळाले. त्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेसचे मंत्री आलमगीर आलम यांच्याद्वारे ही रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत गर्दी जमवण्यासाठी एका डान्सरला बोलाविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याच रॅलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये मंचावर काही महिला आणि नेते बसलेले दिसत आहेत. त्यांच्यासमोरच डान्सर लैला मै लैला या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. यादरम्यान त्या ठिकाणी जमलेल्या काही कार्यकर्त्यांनीही या गाण्यावर ठेका धरला होता. झारखंड भाजपचे प्रवक्ते कुणाल सारंगी यांनी याचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. ‘इटलीच्या हवेतच डान्स आहे. हवा तर थांबवाल, परंतु डान्स कसा थांबवाल? काँग्रेसचे शेतकर्‍यांबद्दलचे हे प्रेम पाहून डोळ्यांत अश्रू आले. 18 फेब्रुवारी रोजी सरायकेला खरसावो जिल्ह्यातील कुकडू प्रखंज येथे आयोजित केलेल्या जनआक्रोश रॅलीचा नजारा,’ असे म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply