Breaking News

नेरळ पूर्व भागातील नाला बिल्डर घशात घालतोय; पावसाळ्यात पाणी घरात घुसणार

कर्जत : बातमीदार

नेरळ पूर्व भागातील नैसर्गिक नाल्यात अक्षर बिल्डरकडून मातीचा भराव केला जात असून, त्यामुळे पावसाळ्यात या भागात पाणी साचून राहणार आहे. त्या नैसर्गिक नाल्यावर असलेली मोरी (साकव) अधिक रुंद करावी अशी मागणी असताना, अक्षर बिल्डरकडून नाल्यामध्ये मातीचा डोंगर उभा करण्यात आला आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतदेखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पावसाळ्यात नेरळ पूर्व भाग जलमय  होण्याची शक्यता आहे.  

 निर्माणनगरी परिसरात अक्षर बिल्डरकडून गृह प्रकल्प साकारला जात आहे. नेरळ-कळंब रस्त्यालगत असलेल्या या गृह प्रकल्पाच्या बाजूने नैसर्गिक नाला वाहत जातो.नेरळपाडा आणि मातोश्रीनगर भागातील पावसाचे पाणी याच नाल्यातून वाहत जाते. या नाल्यावर नेरळ स्टेशनकडे जाण्यासाठी निर्माण ग्रुपने 15 वर्षांपूर्वी साकव बांधला होता. मात्र त्या साकवाला केवळ दोन पाईप टाकल्याने दरवर्षी पावसाळ्यात या भागात रस्त्यावरून पाणी वाहत जाऊन रस्ता बंद होता.त्या ठिकाणी इमारत बांधण्यासाठी बिल्डरकडून थेट नाल्याजवळ मातीचा डोंगर उभा करण्यात आला आहे. हा भराव नाल्याच्या अर्ध्या भागात गेला असून, तो आणखी पुढे ढकलला गेला तर नाला पूर्णपणे बंद होऊ शकतो. ही भीती खरी ठरल्यास पावसाळ्यात नेरळ-कळंब रस्ता आणि नेरळ पूर्व भाग म्हणजे गंगानगर, निर्माणनगरी हा परिसर जलमय होऊ शकतो आणि ते पावसाचे पाणी   शक्यता आहे. याबाबत ग्रामपंचायतीला कळवूनदेखील कारवाई होत नाही.

– नैसर्गिक नाला बंद करण्याचा कोणताही हेतू नसून आम्ही ती माती उचलणार आहोत. नाल्याच्या दोन्ही बाजूने काँक्रीटची भिंत टाकून तो मजबूत करणार आहे. त्याचवेळी साकवदेखील जास्त पाणी वाहून जाणारा बनविणार आहोत.

-विरेंद्र जाधव, मालक,

अक्षर बिल्डर

– नैसर्गिक नाला बंद होणार असेल तर तात्काळ केलेला भराव बाजूला करण्याच्या सूचना केल्या जातील आणि बिल्डरचा हेतू नाला बंद करण्याचा असेल तर कारवाई केली जाईल -राजेंद्र गुडदे, ग्रामविकास अधिकारी, नेरळ

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply