Breaking News

पळस्पे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे अशोक तेजे बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्त

तालुक्यातील पळस्पे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे अशोक तेेजे यांची शुक्रवारी (दि. 13) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अजय तेजे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

या वेळी पळस्पे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत भोईर, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सदस्य दिनेश बेडेकर, अरुणा भोईर, सपना वारके, निता भगत, रेखा दामोदरे, विजय गवंडी, ग्रामसेवक रा. बा. दासगावकर, सुकापूरचे माजी सरपंच पांडुरंग केणी, माजी सदस्य संगीता केळकर, सुप्रिया तेजे, सज्जन वारके, प्रशांत भगत, बाळकृष्ण भोईर, युवा नेते भुषण कामरेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते जगदिश दामोदरे, हर्षल तेजे आदी उपस्थित होते.

Check Also

खारघर येथे रक्तदान महाशिबिर; आमदार प्रशांत ठाकूर यांनीही दिले योगदान

खारघर ः रामप्रहर वृत्तश्री परशुराम जयंतीचे औचित्य साधून खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी …

Leave a Reply