Breaking News

उमरोली येथील मातीच्या बंधार्याला पुन्हा गळती

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील उमरोली गावाच्या मागे असलेला मातीच बंधारा सततच्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरून फुटून गेला आहे. गतवर्षी देखील या बंधार्‍याचे पाणी सांडव्याऐवजी अन्य भागातून बाहेर पडल्याने स्थानिक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.

उमरोली गावाच्या मागे वन क्षेत्र जमिनीजवळ मातीचा बंधारा आहे. त्या बंधार्‍यात स्थानिक ग्रामस्थ गणेश विसर्जन करीत असतात. त्या पाण्याचा उपयोग स्थानिक वेगवेगळ्या कामासाठी वापरात असतात, मात्र त्या मातीच्या बंधार्‍याची दुरुस्ती करताना जिल्हा परिषद कडून कोणतीही मोठी तरतूद होत नाही आणि त्यामुळे दरवर्षी त्या बंधार्‍याचे नुकसान होते आणि त्याचा परिणाम परिसरातील शेतीत पाणी घुसून त्या शेतीचे नुकसान केले जाते.यावर्षी मागील आठवडाभर सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे मातीच्या बंधार्‍याचा बांध फुटला आणि त्याचा परिणाम यावर्षीसुद्धा शेतीचे नुकसान झाले आहे. त्याबाबत स्थानिक कार्यकर्ते दीपक बुंधाटे यांनी उमरोली ग्रामपंचायत आणि कर्जत पंचायत समितीकडे नुकसान भरपाई मिळण्याची आणि बंधार्‍यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

Check Also

कर्मवीर अण्णांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

सातारा : रामप्रहर वृत्त आशिया खंडातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक …

Leave a Reply