अहमदाबाद : वृत्तसंस्था
चौथ्या कसोटी भारताने एक डाव राखून आणि 25 धावांनी इंग्लंडचा पराभव केला. या सामन्यासोबतच भारताने चार सामन्यांची ही कसोटी मालिका 3-1ने जिंकली. त्याचप्रमाणे आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरी अव्वल स्थानासह गाठली आहे.
ऋषभ पंतची शतकी खेळी आणि वॉशिंग्टन सुंदरची नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डाव्यात 160 धावांची आघाडी घेतली होती. अन्य फलंदाज न उरल्याने सुंदरचे शतक अवघ्या चार धावांनी पूर्ण होऊ शकले नाही. यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाचे फलंदाज आर. अश्विन आणि अक्षर पटेलच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. दोघांनीही प्रत्येकी पाच विकेट घेत भारताच्या नावावर अजून एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
डब्ल्यूटीसीचे तिकीट मिळवण्यासाठी भारताला इंग्लडंचा पराभव करणे किंवा सामना अनिर्णित राखणे गरजेचे होते; अन्यथा भारताच्या जागी ऑस्ट्रेलियाला संधी मिळाली असती, परंतु भारताने इंग्लंडवर शानदार विजय मिळवित प्रतिष्ठेच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …