सरकारी रुग्णालयात मोफत; खाजगी रुग्णालयात 250 रुपयांत लस
खारघर : प्रतिनिधी
पनवेलमध्ये कोरोना लस आता सर्वसामान्य नागरिकांसाठीही उपलब्ध होणार आहे. ही लस सरकारी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात नागरिकांना घेता येणार आहे. पनवेल पालिका क्षेत्रात कोरोना लसीकरण पहिला व दुसरा टप्पा झाल्यानंतर आता शासनाच्या आदेशानुसार सर्वसामान्यांनादेखील ही लस घेता येणार आहे.
याकरिता पालिकेच्या माध्यमातून पूर्वतयारी सुरू आहे. लवकरच याबाबत शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यावर 250 रुपयांत ही लस घेता येणार आहे. आयुष्यमान भारतशी संलग्न असलेले हॉस्पिटल आणि केंद्रीय आरोग्य योजनेतील रुग्णालयात कोरोनाची लस दिली जाणार आहे. पालिका क्षेत्रात खाजगी रुग्णालयात 4968 तर सरकारी क्षेत्रातील 267 आरोग्य क्षेत्रातील कर्मचार्यांनी लसीकरणासाठी आपले नाव नोंदविले होते. पहिल्या टप्प्यात 70 टक्के नोंदणी केलेल्या या घटकांनी लसीकरण केले मात्र बहुतांशी जणांनी आद्यपही लसीकरण केले नसले तरी सर्वसामान्यांना हि लस घेता येणार आहे.
पहिला गट शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा या गटात समावेश करण्यात आला आहे.
आरोग्य कर्मचार्यांच्या लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आलेय, दुसरा गट फ्रंटलाईन वर्कर्स. यात राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधले कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक आणि महानगरपालिका कर्मचार्यांचा समावेश करण्यात आलाय, तिसरा गट 50 वर्षांवरचे लोक आणि ज्यांना इतर व्याधी म्हणजे को-मॉर्बिडिटी आहेत अशा 50 वर्षाखालच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आलाय. दुसर्या टप्प्यात पोलीस, संरक्षण खात्यातील व्यक्ती, पालिका कर्मचारी, बेस्टचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना लस दिली जाणार आहे. तर लस घेण्यास नकार देणार्या कर्मचार्यांचे काऊन्सेलिंग करण्यात येणार आहे.
यासंदर्भात राज्य शासनाच्या सुचना प्राप्त झाल्यावर या बाबत सविस्तर माहिती देता येईल. -डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय अधिकारी, पनवेल महानगरपालिका
नोंदणी कशी कराल?
लसीकरणासाठी कोविन अॅपवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करण्यासाठी फोटो असणारे ओळखपत्र असणे आवश्यक असेल. स्वतःची नोंदणी करताना इलेक्ट्रॉनिक केवायसीसाठी ओळखपत्र स्कॅन करून जोडावे लागेल. यासाठी 12 ओळखपत्रांचा पर्याय देण्यात आलेला आहे. मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मनरेगा रोजगार कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसचे पासबुक, पासबुक, पेन्शनची कागदपत्रे
लसीकरणासाठी रुग्णालये
सरकारी
1) एमजीएम मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल फोर वुमेन्स अॅण्ड चाईल्ड
2) डॉक्टर जी. डी. पोळ फाऊंडेशन
3) एमजीएम मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल
खाजगी
1) श्री सत्यसाई संजीवनी सेंटर ऑफ चाईल्ड हार्ट केअर, खारघर
2) डॉक्टर परवर्धन स्मृती रुग्णालय
3) पनवेल हॉस्पिटल (उरण नाका)
4) उन्नती हॉस्पिटल, पनवेल
5) लाईफ लाईन हॉस्पिटल
6)बिरमोळे हॉस्पिटल
7) श्री साई मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल
8) आशा मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, पनवेल
9) श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल, कळंबोली