पेण : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढत असून शनिवारी (दि. 11) सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ सरपंच राजेश मोकल यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करीत पक्ष वाढविण्याचा निर्धार केला.
या कार्यक्रमास माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील, माजी नगराध्यक्ष प्रितम पाटील, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, माजी नगराध्यक्ष गीता पालरेचा, युवा नेते अनिरुद्ध पाटील, राजेश मपारा, महादेव दिवेकर, ललित पाटील, डी. बी. पाटील, बापू दळवी, प्रसाद भोईर आदी उपस्थित होते.
मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करून सर्वांनी भारतीय जनता पक्ष अधिकाधिक मजबूत करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करूया, असा निर्धार व्यक्त केला.
राजेश मोकल यांनी सांगितले की, आम्ही आज पुन्हा स्वगृही परत आलो असून समाजकारण करीत असताना येत्या काळात वडखळ भागात भाजपच्या माध्यमातून अनेक विकासकामे करणार आहोत.
या वेळी वडखळ सरपंच राजेश मोकल यांच्यासह माजी पं. स. समिती सदस्य पूजा मोकल, माजी सरपंच मनोहर कोळी, सुनील जांभळे, लक्ष्मी नाईक, माजी उपसरपंच जगदीश म्हात्रे, सदस्य धनाजी नाईक, अनिता म्हात्रे, प्रमिला म्हात्रे, हिराजी म्हात्रे, विजय गायकवाड, कैलास पाटील, चंद्रकांत पाटील, वैभव कोळी, दीपक कोळी, संजय पाटील, भरत म्हात्रे, संजय पवार, अनंता वाघमारे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper