Breaking News

नवी मुंबईत होणार भव्य मासळी मार्केट

आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत कामाचे भूमिपूजन

नवी मुंबई : प्रतिनिधी

दिवाळे गावातील मासळी मार्केट हे भव्य व सुसज्ज असे निर्माण व्हावे, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून एक कोटी 25 लाख व नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 40 लाख अशा एकूण एक कोटी 65 लाख निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. सर्व सुविधांयुक्त उभारण्यात येणार्‍या मच्छी मार्केटचा भूमिपूजन सोहळा आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत फगवाले मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष अनंता बोस यांच्या हस्ते झाला.

या कार्यक्रमात माजी सभापती संपत शेवाळे, डॉ. जयाजी नाथ, स्थानिक नगरसेविका भारती कोळी, नगरसेवक अशोक गुरखे, दीपक पवार, परिवहन सदस्य काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक दि. ना. पाटील, विकास सोरटे, बाळकृष्ण बंदरे, दर्शन भारद्वाज, दीप्ती कोळी, प्रियांका म्हात्रे, सुभाष गायकवाड तसेच असंख्य मासळी विक्रेत्या महिला, मच्छिमार बांधव, एकविरा मच्छी विक्रेता संघ व शिवाई महिला मच्छिमार उपस्थित होते.

या मासळी मार्केट उभारण्याकरिता शासन दरबारी गेली दोन वर्षांचा सततचा पाठपुरावा तसेच सीआरझेड, वन विभाग व उच्च न्यायालय अशा विविध परवानग्या मिळविण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.

या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले कि, दिवाळे गाव हे मासळी मार्केट म्हणून प्रसिद्ध असून या मासळी मार्केटमध्ये विविध गावातून, शहरांतून अनेक नागरिक मासे खरेदीसाठी येत असतात. या मार्केटची झालेली दुरवस्था तसेच वाहतुकीची होणारी कोंडी पाहता  भव्य, सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त असे मासळी बाजार उभारावे, याकरिता मी गेली दोन वर्षे शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. ही जागा वनविभाग अंतर्गत असल्याने तसेच सीआरझेडची अतिरिक्त परवानगीची आवश्यकता असल्याने उच्च न्यायालयात हे प्रकरण हाताळावे लागले, परंतु हे सर्व अडथळे पार करून सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्याने मासळी मार्केट उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनेही सदर मार्केटकरिता 40 लाख तरतूद केली असून लवकरच आपल्याला सुसज्ज मासळी मार्केट उभारलेले दिसेल. तसेच गावातील जेट्टी उभारणीकरिताही 10 कोटी प्रस्तावित असून गावात स्वच्छता अभियान राबविण्याची गरज असून ग्रामस्थांनीही पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी या वेळी केले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply