Breaking News

दहशतवादी हल्ल्याचा निषेध, शहिदांना श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्त

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा पनवेल प्रभाग क्र. 17, शिवाजी नगर वसाहत येथे निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 39 जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे एकाच वेळी हळहळ आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे. या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व प्रभाग क्र. 20चे अध्यक्ष मनोहर मुंबईकर, पदाधिकारी, कार्यकर्ते, रिक्षा युनियनचे कार्यकर्ते, महिला, वसाहतीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रसायनीत कँडल मार्च

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशाचे 39 जवान शहीद झाले आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी रसायनीतील शिवनगर येथील बी फिट जिममधील तरुणांनी मेणबत्ती रॅली काढली होती. या वेळी मोठ्या संख्येने तरुणांची उपस्थिती होती.शिवनगरमधील हनुमान मंदिरापासून हातात पेटत्या मेणबत्ती घेऊन कल्पतरू हॉस्पिटल ते दुर्गामाता कॉलनी व तेथून गणेशनगर अशी रॅली निघाली होती. वरद टॉवरजवळ जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम झाला. या वेळी पाकला सडेतोड उत्तर देण्याची मागणी तरुणांसह नागरिकांनी केली. यानंतर मेणबत्ती रॅली चांभार्लीहून शिवनगर हनुमान मंदिर येथे येताच तरुणांनी एकत्रित मेणबत्ती लावून राष्ट्रीय गीताने सांगता केली.

पनवेल : वार्ताहर

पनवेलजवळील आकुर्ली गावच्या निवासींनी एकत्र येत जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला, तसेच या घटनेत शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. जयहिंद फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन महेश अनपट व यशवंत बिडये यांनी केले होते.या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य व भाजप युवा मोर्चा अध्यक्ष भूपेंद्र पाटील, आकुर्ली गावचे सरपंच सचिन पाटील, अपेक्षा कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष नागप्पा पाटील, उपाध्यक्ष स्नेहा बांदकर, सचिव शशिकांत पवार, पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष सुधीर चाळके, श्री. गवई, श्री. सुर्वे, सिद्धेश सुळे, अपेक्षा कॉम्प्लेक्स, पनवेल पॅराडाईज, मातेश्वरी कॉम्प्लेक्स, साई सपना सोसायटी, साक्षी पार्क सोसायटी, वरदविनायक सोसायटी यांचे पदाधिकारी, सदस्य, रहिवासी, आकुर्ली ग्रामस्थ, तरुण गणेश मित्र मंडळाचे प्रतिनिधी, तसेच इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply