Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते मोहोपाडा हद्दीत विकासकामांचा शुभारंभ

मोहापाडा ः रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीतील तळेगाव, तळेगाववाडी, पानशील व शिवनगर नवीन वसाहतीसाठी नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे, तर आमदारमहोदयांच्या स्थानिक विकास निधीतून तळेगाववाडी येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या दोन्ही विकासकामांचा शुभारंभ आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 14) झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल, हर घर जल ही योजना देशभर राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीतील तळेगाव, तळेगाववाडी, पानशील व शिवनगर नवीन वसाहतीसाठी नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते तळेगाव येथे झाले. याचबरोबर तळेगाववाडी येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लाख रुपये मंजूर झाले आहेत. याचेही भूमिपूजन त्यांच्याच हस्ते झाले.
या कार्यक्रमांना भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, वासंबे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल, पंचायत समिती विभागीय अध्यक्ष आकाश जुईकर, पोयंजे पंचायत समिती अध्यक्ष प्रवीण ठाकूर, मोहपाडा शहर अध्यक्ष चेतन जाधव, चौक विभाग अध्यक्ष गणेश मुकादम यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply