मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपायांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तसेच अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिला जाईल आणि त्यांना पेन्शन योजनेचा लाभही घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात सोमवारपासून बेमुदत संप पुकारला होते. याची दखल घेत राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. अंगणवाडी सेविकांसोबत सरकारची चर्चा सकारात्मक झाली. त्यानुसार अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजना सुरू केली जाणार आहे तसेच त्यांना मोबाइलही देण्यात येणार आहे.
Check Also
स्व. गंगादेवी बालदी यांची शोकसभा; मान्यवरांकडून श्रद्धांजली
उरण : रामप्रहर वृत्तउरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे नुकतेच …