Breaking News

चिंध्रणमध्ये विविध कामे प्रगतिपथावर

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील चिंध्रण ग्रामपंचायतीमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन पूल, गावातील अंतर्गत रस्ते आणि गटारांचे काम करण्यात येत आहे. हे काम सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने सुरू झाले असून, याबद्दल भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर आणि शिरवली विभागीय भाजप अध्यक्ष शिवाजी दुर्गे यांनी शासन आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत.या वेळी माजी सरपंच रघुनाथ फराड, हरिश्चंद्र फराड, ग्रामपंचायत सदस्य नरेश सोनावणे, एकनाथ मुंबईकर, सुनील साटे, लक्ष्मण गायकवाड, चेतन कदम, दिनेश पाडेकर, पुंडलिक देशेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. एकनाथ देशेकर आणि शिवाजी दुर्गे यांनी  विकासकामांसंदर्भात माहिती दिली आहे.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply