Breaking News

पाताळगंगा नदीपुलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने मार्गस्थ करण्याचे आदेश

अलिबाग ः जिमाका

जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील खालापूर पथकर स्थानकाजवळील पेण ते खालापूर राज्य मार्ग क्र. 108 (खालापूर कनेक्टर)वरील पाताळगंगा नदीवरील अस्तित्वातील पुलावरील वाहतूक 22 मार्च ते 7 मे या

कालावधीदरम्यान पर्यायी मार्गाने मार्गस्थ करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.

पेण ते खालापूर ते राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 ह्या अस्तित्वातील राज्य मार्ग क्र. 104वरील हलक्या वाहनांची वाहतूक खालापूर पथकर स्थानकाजवळील इंडिया बुल्स वसाहतीपासून राज्य मार्ग क्र. 88 मार्गे खोपोली शिळफाटा चौकवरून अनुक्रमे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 मार्गे पुणे, खालापूर, मुंबईकडे जाण्यासाठी वळविण्यात आली आहे. या मार्गावरून केवळ रात्री 9 ते सकाळी 6 या कालावधीतच अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहील. या मार्गावरून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात येत असून, या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक पेण-पनवेल-कोनमार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48वर मार्गस्थ करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 48वरून खालापूरमार्गे पेणकडे जाणारी हलक्या वाहनांची वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्र. 48वरील खोपोली शिळफाटा चौकपासून राज्य मार्ग क्र. 88 मार्गे इसांबा ते सावरोली ते राज्य मार्ग क्र. 104 ते पेणकडे अशी वळविण्यात आली आहे. या मार्गावरून केवळ रात्री 9 ते सकाळी 6 या कालावधीतच अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहील. या मार्गावरून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली असून, या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक ही राष्ट्रीय महामार्ग क्र. 48वरून कोन-पनवेल-पेण या मार्गे मार्गस्थ करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 48वरून खालापूरमार्गे पुण्याकडे जाणारी हलक्या वाहनांची वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्र. 48वरील खोपोली शिळफाटा चौकापासून राज्यमार्ग क्र. 88 मार्गे इसांबा ते सावरोली ते राज्यमार्ग क्र. 104 ते खालापूर पथकर

स्थानकमार्गे पुणे अशी वळविण्यात आली. या मार्गावरून केवळ रात्री 9 ते सकाळी 6 या कालावधीतच अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहील. या मार्गावरून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली असून, या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक कोन येथील पुलापासून द्रुतगती मार्ग ते खालापूर पथकर स्थानकमार्गे पुण्याकडे मार्गस्थ करण्यात आली आहे.

जेएनपीटी ते कोन ते खालापूरमार्गे राज्य मार्ग क्र. 104वरून खालापूर पथकर स्थानकामार्गे पुण्याकडे जाणारी हलकी व अवजड वाहनांची वाहतूक कोन येथील उड्डाणपुलाच्या उतारावरून यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाला मिळून खालापूर पथकर स्थानकामार्गे पुण्याकडे वळविण्यात आली आहे. तरी नागरिकांच्या सोयीसाठी या वाहतूक नियोजन बदलाची नोंद सर्वांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Check Also

शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिराच्या पोलीस कोठडीत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल तक्का …

Leave a Reply