Breaking News

मोदी सरकारचा ज्येष्ठांना आधार

1 मार्चपासून मोफत कोरोना लसीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार असून, ही लस केंद्र सरकारकडून मोफत दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी (दि. 23) पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
60पेक्षा जास्त वय असणारे नागरिक, तसेच इतर व्याधी असणार्‍या 45हून अधिक वयाच्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाणार आहे. 10 हजार सरकारी आणि 20 हजार खासगी केंद्रांवर ही मोहीम राबविली जाईल. ही लस मोफत दिली जाणार असून, सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.
जावडेकर पुढे म्हणाले की, ज्यांना खासगी रुग्णालयातून लसीकरण करून घ्यायचे आहे त्यांना पैसे भरावे लागतील. यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचा निर्णय आरोग्य मंत्रालय पुढील तीन ते चार दिवसांत घेईल. आरोग्य मंत्रालयाची यासंबंधी रुग्णालये आणि लसनिर्मिती करणार्‍या कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्रासह सहा राज्यांत केंद्रीय पथके
कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारकडून तीन सदस्यीय पथके पाठवण्यात आली असून, यामध्ये महाराष्ट्रासह केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीरचा समावेश आहे. कोरोनाशी लढण्यात मदत करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. या पथकांचे नेतृत्व आरोग्य मंत्रालयातील सहसचिव-स्तरीय अधिकारी करणार आहेत.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply