Breaking News

नवी मुंबई बाजार समितीतील बेशिस्त वाहनांवर कारवाई

तीन महिन्यात लाखोंचा दंड वसूल

नवी मुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबई वाहतूक पोलीस कार्यालयांतर्गत एपीएमसी वाहतूक पोलिसांनी उपायुक्त वाहतूक पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी वाहतूक शाखेचे निरीक्षक अतुल आहेर यांनी बाजार समितीमधील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या वाहनचालकांकडून विविध कलमांखाली जानेवारी ते मार्च तीन महिन्यात दोन लाख 35 हजार रुपयांचा दंडात्मक रक्कम वसूल केली आहे.

वाहन चालवताना मोबाइल फोनवर बोलणार्‍या एकूण 57 वाहन चालकांकडून नऊ हजार 400 तर, सीट बेल्ट न लावणारे 178 वाहन चालकाकडून 18 हजार दोनशे रुपये व विना हेल्मेट दुचाकी चालवणार्‍या दोन हजार 161 दुचाकी स्वारांकडून 79 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेने जाणार्‍या वाहन सुमारे 100 वाहन चालकांकडून नऊ हजार रुपये, तर लेन कटिंग करणार्‍या 547 अवजड वाहनचालकांवर गेल्या 10 दिवसांत कारवाई करून तीन हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला. सिग्नल तोडल्याबद्दल 147 वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्या कडून 16 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

नवी मुंबई बाजार समितीचा आवार व देशाच्या कानकोपर्‍यातून येणार्‍या अवजड वाहनांमुळे येथे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होते. परिणामी एपीएमसी वाहतूक पोलिसांवर ताण येतो, तरीदेखील जानेवारी ते मार्च या कोरोना काळात या वाहतूक शाखेतील वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांनी वाहन चालकांवर  दंडात्मक कारवाई करून सुमारे दोन लाख 35 हजार 500 रुपये रक्कम वसूल केली. तसेच वाहन चालवताना मोबाइल वर बोलणे व सिग्नल तोडणे अशा सुमारे 156 वाहन चालकांवर कारवाई करून त्यांचा परवाना निलंबीत केला आहे, असे एपीएमसी वाहतूक शाखेचे निरीक्षक अतुल आहेर यांनी सांगितले.

कोरोना रोखण्यासाठी ऑपरेशन ‘ऑल आऊट’

शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शुक्रवारी नवी मुंबई पोलिसांनी पालिका प्रशासनाच्या मदतीने ‘ऑल आऊट’ मोहीम राबवली. यात सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे, मास्क न लावणार्‍या अनेकांना कारवाईला सामोरे जावे लागले. सर्वाधिक कारवाई ही सिग्नल आणि एपीएमसीमध्ये करण्यात आली. या पथकाला पाहून काहींनी हनुवटीवर असलेला मास्क तोंडावर चढवला. पोलिसांच्या या ऑल आऊट मोहिमेमुळे शहरात निर्धास्त फिरणार्‍या नागरिकांवर वचक निर्माण झाला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply