पनवेल : वार्ताहर
विविध दुकानांमधून तसेच मॉलमधून तेथील महागड्या वस्तू, कपडे, तसेच चिजवस्तु इत्यांदीची खरेदी करून पेटीएमद्वारे या खरेदीचे बिल पेड केल्याचा पेटीएमचा बनावट मेसेज संबधित विक्रेत्यांना दाखवून त्यांची फसवणुकीच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याअनुशंगाने वाशी पोलीस ठाणे हद्दीत अदा बुटीक येथे 9 मार्च रोजी कपडे खरेदी करून 38,000 रुपये किमतेचे बिल पेटीएमद्वारे पेड केले असे भासवुन फसवणुक झाल्याची घटना घडली होती.
या अनुशंगाने तक्रारदाराच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करून गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपींचा शोध लावला. त्यामध्ये मुख्य आरोपी नामे प्रेम नवरोत्तम सोलंकी (वय 31) तसेच त्याची मैत्रीण प्रिती राजेश यादव उर्फ तन्वी शर्मा (वय 23) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून फसवणूक करून घेतलेला माल, गुन्ह्यात वापरलेले वाहन, मोबाइल, चार सिमकार्ड असा एकुण 74,300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.