तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे निर्माण होणार्या समस्यांमध्ये मनःशांती हरपल्याचा मुद्दाही काही जण जोडत असतात. आज मनःशांती हरवत चालली आहे, हे वास्तव आहे; पण तंत्रज्ञान हे त्याचे मुख्य कारण नाही. उलट आता याच तंत्रज्ञानाने मनःशांती मिळवून देण्याची किमया साधली जाणार आहे. यासाठी थिंकफ नावाचे उपकरण तयार करण्यात आले आहे. या उपकरणामुळे मन अधिक ताजेतवाने बनते, तसेच ड्रग्ज वा औषधे घेतल्यानंतर येणारी सुस्ती (स्लंबर) आणि काही न करता पडून राहण्याची इच्छाही ह्यातून उत्पन्न होत नाही असा निर्मात्यांचा दावा आहे.
संगणकीय तंत्रज्ञानाने मानवी जीवनाच्या विविध बाजूंना नुसता स्पर्शच केलेला नाही तर त्यांमध्ये खोलवर प्रवेश केला आहे हे आपण सातत्याने अनुभवतोच. आयटी म्हणजे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ऊर्फ माहिती तंत्रज्ञान हे शब्द आज अर्धशिक्षित लोकांपर्यंतही पोहोचले आहेत. संगणक व इतर संबंधित उपकरणांचा आज वाढता वापर सगळीकडे दिसतो आहे. या डिजिटल युगात आपले जीवन सुसह्य करायचे कामही संगणक व इतर उपकरणे करत आहेत. गेल्या दशकापासून विविध नित्योपयोगी वस्तूही स्मार्टफ होऊ लागल्या आहेत आजच्या ह्या गतिमान आधुनिक युगात आपले जीवन इलेक्ट्रॉनिक साधनांनी आणि सुविधांनी व्यापून टाकलेले आढळते. अर्थात तसे पाहिले तर बरीचशी उपकरणे फारशी नवीन आणि क्रांतिकारी नसतात. म्हणजे असे की त्यांमधील एखादी सुविधा (फीचर) नवे असते परंतु एकंदरीने विचार केल्यास काही मूलभूत संकल्पना आणि त्यांवर आधारित साधनांचीच ती सुधारित आवृत्ती असते.
आता मात्र, वेअरेबल्सफ वर्गातील काही उत्पादनांमुळे हे चित्र बदलण्याची चिन्हे आहेतउदाहरणार्थ थिंकफ!
मानवाने निर्माण केलेल्या कोणत्याही अतिप्रगत महासंगणकापेक्षाही मानवी मेंदूच सर्वश्रेष्ठ आहे कारण विचारपूर्वक निर्णय घेण्याची आणि नवनिर्मितीची क्षमता त्यात आहे असा एक मतप्रवाह आहे. आपला मेंदू एखाद्या मोठ्या संगणकापेक्षाही वेगाने अपरिचित समस्यांवर विचार करू शकतो (आणि त्याने काढलेले निष्कर्ष बरेचदा योग्यच असतात) हे त्याचे वैशिष्ट्य्े आहे. आज आपल्यालाच आपल्या मेंदूची पूर्ण माहिती नाही व ती मिळवण्याच्या दृष्टीने सर्वत्र उच्च पातळ्यांवर संशोधन सुरू आहे. मेंदूतील हजारो-लाखो चेतापेशी (न्यूरॉन्स) कमी दाबाच्या विद्युतसंदेशांद्वारे परस्परांशी बोलतातफ हे आपल्याला माहीत आहे, तसेच मेंदूचे विविध भाग विशिष्ट प्रकारच्या संवेदनांचे व भावनांचे विश्लेषण करतात हेदेखील. विशिष्ट बाह्य चेतना आणि संदेशांद्वारे मेंदूला उत्तेजित वा शांत करता येते. ह्यामध्ये विशिष्ट दृश्ये, आवाज, संवाद अशी माध्यमे वापरली जातात. थिंकफ हे साधन अशाच एका मार्गाने आपल्या मेंदूशी संवाद साधते.
थिंक हे किंचित वक्राकार उपकरण वापरकर्त्याच्या स्मार्टफोनच्या संपर्कात राहून काम करते. ह्यासाठी लो एनर्जी ब्ल्यूटूथचा उपयोग केला जातो. ह्यासोबत दोन चिकटपट्ट्या पुरवल्या जातात. वापरणार्याने त्या स्वतःच्या डोक्यावर, कानामागे विशिष्ट ठिकाणी चिकटवायच्या असतात. थिंक मोड्यूल चालू करून त्याचा स्मार्टफोनशी संपर्क प्रस्थापित झाला की त्यामधून, कमी शक्तीचे, वीज-तरंग वापरकर्त्याच्या मेंदूपर्यंत ह्या पट्ट्यांमार्फत पोचवले जातात. 1960 पासून, तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच, हॉलीवूडमध्ये निर्माण होऊ लागलेल्या विज्ञान-पटांसारखे वाटते ना?! पण हे सत्य आहे, 2015 मध्ये देखील!! ह्या पट्ट्या चिकटवण्याची पद्धती दाखवणारा सेटअप-कम-डेमो व्हीडिओफ समाविष्ट असून तो संबंधित स्मार्टफोनवर बघता येतो त्यामुळे जागा चुकण्याचे तसे काही कारण नाही. असो. तर वीजप्रवाह सुरू झाला की शरीर ह्या बिनतारी वीजवाहक सर्किटफ चा एक भाग बनते. ह्यामार्फत मेंदूच्या विशिष्ट संवेदना-केंद्राशी संबंधित चेतापेशी उत्तेजित केल्या जातात आणि काही काळातच वापरकर्त्याला – त्याच्या गरजेप्रमाणे – उल्हसित किंवा शांत वाटू लागते! स्मार्टफोन वा मूळ उपकरणातून ह्या वीजप्रवाहाची तीव्रता ऍडजस्टफ करता येते. थिंकच्या उत्पादकांच्या म्हणण्यानुसार योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा वा शांतिवर्धक औषधांमुळे साधणारा परिणाम ह्या साधनाच्या वापराने मिळवता येतो.
इच्छित परिणाम होण्यासाठी दोन्ही पॅड्स ऊर्फ चिकटपट्ट्या योग्य जागी बसवलेल्या असणे फार महत्त्वाचे आहे. कारण अशा प्रकारच्या संवेदनांना प्रतिसाद देणार्या केंद्राचे मेंदूतील स्थान अचूकपणे शोधल्याचा दावा थिंकने केला आहे. त्यानुसार दोन्ही पट्ट्या वेगवेगळे काम करतात – शांतिकारक स्पंदनांमुळे (काम व्हाइब) वापरणार्याचे मन स्थिर होते तर उत्तेजक कंपने (एनर्जी व्हाइब्ज) ते अधिक सक्रिय, सावध आणि उत्साही बनवतात. आपण जिममध्ये एखादा व्यायामप्रकार निवडतो त्याचप्रमाणे हे ठरवता येते. थिंकचे काम सुरू झाले की फक्त (शक्यतो) एके जागी बसून मिळणारे फीलिंगफ एंजॉय करायचे बस्स!! मुख्य म्हणजे दहाएक मिनिटेच हे साधन वापरले तरी त्यातून उत्पन्न होणारा परिणाम तासनतास टिकतो असेही उत्पादक म्हणतात. वापरकर्त्याने सेटिंग फारच हायफ चढवले तर मात्र काही काळ त्वचेवर मुंग्या आल्यासारखी संवेदना निर्माण होऊ शकतेतेव्हा दोन-चारदा प्रयोग करूनच स्वतःला योग्य असलेली पातळी मिळवावी हे उत्तम.
अर्थात ह्याला दुसरी बाजू आहेच – ह्या पद्धतीने मनःशांती (किंवा उत्साह) साध्य करण्याची तुलना अनेकांनी ड्रग्ज म्हणजेच मादक द्रव्ये घेऊन नशा मिळवण्याशी केली आहे!! अगदी इतकी टोकाची भूमिका घेतली नाही तरी डॉक्टरांकडून काही आजारांदरम्यान नियमितपणे (आणि पूर्णतः कायदेशीर मार्गाने) दिल्या जाणार्या प्लेसिबो प्रकारच्या गोळ्या देखील मनुष्यावर असाच परिणाम घडवतात असे त्यांचे म्हणणे आहे (प्लेसिबो म्हणजे औषधी गुणधर्म नसलेली परंतु खर्या गोळीसारखीच दिसणारी गोळी वा द्रव. विशिष्ट परिस्थितीत किंवा औषधांच्या परिणामांची तुलना करण्यासाठी ह्या दिल्या जातात). असे काहीही न करता, ध्यानधारणा आणि योगासनांमुळेही अशी मनःशांती मिळू शकत असताना बाह्य आणि महागड्या उपकरणांची गरजच काय? असा प्रश्न विचारला गेला आहे.
थिंकच्या उत्पादकांनी आणि वापरकर्त्यांनी ह्या हरकती खोडून काढल्या आहेत- ड्रग्जमुळे येणारा बालिश अति-उत्साह ह्यातून मिळत नाही; तर मन अधिक ताजेतवाने बनते, तसेच ड्रग्ज वा औषधे घेतल्यानंतर येणारी सुस्ती (स्लंबर) आणि काही न करता पडून राहण्याची इच्छाही ह्यातून उत्पन्न होत नाही असे थिंकच्या पुरस्कर्त्यांचे म्हणणे आहे.
थिंकचा वापर किती वेळा करावा? खरे तर दिवसातून एकदा. काही लोकांनी हे दिवसातून दोन-तीन वेळाही वापरले आहे परंतु अजून तरी काही साइड इफेक्टफ दिसलेला नाही. ह्याच्या वापरावर एक व्यावहारिक मर्यादा मात्र दिसून आली आहे – ती म्हणजे चिकटवण्याच्या पट्ट्या. पट्ट्यांची एक जोडी एकदाच वापरावी अशी शिफारस उत्पादकांनी केली आहे (कारण नंतर त्या योग्य जागी चिकटून राहात नाहीत असे त्यांचे म्हणणे.) परंतु व्यवहारात हे वाजवी नाही कारण एका जोडीची किंमत जवळजवळ चार डॉलर्स आहे! परंतु काही वापरकर्त्यांनी एकाच जोडीचा वापर 7-8 वेळाही करून दाखवला आहेनंतर मात्र त्या त्वचेवरून सुटतात असा त्यांचा अनुभव आहे. शिवाय आपली त्वचा तेलकट वा केसाळ असेल तर त्या टिकत नाहीत तसेच मेकअप वरून चिकटवता येत नाहीत (म्हणजे पट्टी चिकटते परंतु इच्छित परिणाम मिळत नाही) असेही आढळले आहे.
प्रत्येक पट्टी म्हणजे फक्त जखमेवर लावतात तसली साधी चिकटपट्टी नसून खरे तर मेंदूशी संवाद साधणारे माध्यम आहे आणि त्यांचे मटेरिअल, वापरलेला डिंक, त्वचेशी येणार्या संपर्काचा दाब इ. बाबतींत मोठे संशोधन समाविष्ट असल्याने त्यांची किंमत जास्त आहे असे स्पष्टीकरण उत्पादक कंपनीने दिले आहे.
थिंकफचे चार्जिंग करण्यासाठी एक मायक्रो-यूएसबी केबलफ दिली जाते. साधारण 30 मिनिटांच्या सेशनफ नंतर बॅटरी अर्धी उतरलेली असते. थिंक ची आणखी एक मर्यादा म्हणजे सध्या तरी ते फक्त आयओएस-8 सोबतच काम करू शकते त्यामुळे अँड्रॉइडवाल्यांना त्याच्या नव्या आवृत्तीची वाट पाहात बसण्याखेरीज गत्यंतर नाही! असो. विज्ञान-काल्पनिका म्हणजेच सायन्स फिक्शनमध्ये पूर्वीपासून चितारलेली, मेंदूशी अशाप्रकारे संवाद साधण्याची, संकल्पना आता प्रत्यक्ष वापरात आणता येईल असे दिसते! विविध प्रकारच्या भावना ह्या मार्गाने (म्हणजे औषधे, उत्तेजके आणि रसायनांच्या ऐवजी वीज वापरून) मिळवता येतील असा विश्वास संबंधित तज्ज्ञांनी दर्शवला आहेकळेलच काय होते ते!
-डॉ. दीपक शिकारपूर