Breaking News

काँग्रेसची ‘महाराष्ट्री तोडो’ यात्रा

भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची टीका

पनवेल : रामप्रहर वृत्त
आपल्या पक्ष श्रेष्ठींची मर्जी सांभाळण्यासाठी वाट्टेल ते करण्यात नाना पटोले पटाईत आहेत, मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्यास काँग्रेस नेते कसे धजावतात? हे महाराष्ट्रातील जनतेने विचारलेच पाहिजे. याला भारत जोडो म्हणत नाहीत, तर याला महाराष्ट्र तोडो म्हणता येईल, अशी घाणाघाती टीका भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.
अगोदरच राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाने महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धक्कादायक विधान करून वादाला तोंड फोडले आहे. भगवान बिरसा मुंडा हे इंग्रजांच्या प्रलोभनांना बळी पडले नाहीत. उलट सावरकर यांनी इंग्रजांना पत्रव्यवहार करून माफी मागितली होती, असे पटोले म्हणाले. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर, सावरकर हे इंग्रजांकडून महिन्याला 60 रुपये पेन्शनदेखील घेत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या विधानावर सर्वत्र संताप व्यक्त केला असून असून पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ट्वीट करून नाना पटोले हे आपल्या पक्षश्रेष्ठींची मर्जी सांभाळण्यासाठी वाट्टेल ते करण्यात पटाईत, असल्याचे म्हटले आहे.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply