Breaking News

मोटारसायकल चोरास कर्जत पोलिसांनी केली अटक

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

दहिवली येथील एका कार्यालयासमोर ठेवलेली मोटारसायकल चोरणार्‍याला कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

कर्जत तालुक्यातील आषाणे – कोषाणे येथील  योगेश रामचंद्र ठाणगे यांनी 8 एप्रिल रोजी त्यांची हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल दहिवली येथील एका कार्यालयासमोर उभी करून ते कामाला गेले होते. परत आल्यानंतर त्यांना सदर ठिकाणी मोटारसायकल दिसून आली नाही. त्यांनी मोटारसायकलची चोरी झाल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यांमध्ये दाखल केली होती.

 कर्जत पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील  उपनिरीक्षक सचिन गावडे, अंमलदार सुभाष पाटील,  भूषण चौधरी, अश्रूबा बेंद्रे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अक्षय स्वामीनाथ डांगरे (वय 25, रा. कोलीवली ता. कर्जत) याला संशयित म्हणून ताब्यात घेऊन  चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याला अटक करून चोरून नेलेली 15 हजार किंमतीची हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल जप्त केली. पुढील तपास सुरू आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply