Breaking News

पेणमध्ये कोरोनाचा कहर

रोजची रुग्णसंख्या 50 ते 70 च्या घरात

पेण : प्रतिनिधी

पेण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून दिवसाला 50 ते 70 संख्येने रुग्ण वाढत आहेत. गेल्या आठवड्यापासून आकडा वाढल्याने पेणकर धास्तावले आहेत. तेवढीच बेफिकिरीही वाढली आहे. अजूनही विनामास्क बाजारात 20 ते 25 जण सहज दिसून येत आहेत. दुसरीकडे पेण उपजिल्हा रुग्णालयात तसेच केंद्रात लसीचा अद्याप तुटवडा जाणवत आहे.

कोरोना विषाणूच्या पाश्वर्भूमीवर यंदाचा लॉकडाऊन 15 एप्रिल ते 1 मे पर्यंत दुसरा जाहीर झाला आहे. या लॉकडाऊनमध्ये संचारबंदी आहे. मात्र किराणा, तसेच भाजी, मच्छी विकत घेण्यासाठी सवलत आहे. मात्र नागरिकांनी लॉकडाऊनच्या आधी म्हणजेच 14 एप्रिल रोजी दिवसभर भाजी, मच्छी, तसेच किराणा सामान खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा अनेक व्यापार्‍यांनी घेतला. नेहमीची भाजी, मच्छी, लोकांना अधिक भावाने विकत घ्यावी लागली. यामुळे पेण शहरात मंगळवारी दिवसभर बाजारपेठेत गर्दी दिसून आली.

दररोज लस घेण्यासाठी रांगा लागत आहेत. सरकार व पोलीस प्रशासन यांच्या कडून कोरोनाची साखळी तोडण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनीही अटी व नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

45 वर्ष वयापुढील सर्व व्यक्तींनी कोरोना प्रतिबंध लस घेणे गरजेचे असल्याने लसीकरणासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सवलत दिली आहे. याशिवाय कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठीही सवलत दिली आहे. किराणा, भाजी, मच्छी विकत घेण्यासाठीही सवलत दिली आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply