आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य
पनवेल ः प्रतिनिधी
भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस पनवेल महापालिका प्रभाग 17मधील नगरसेवकांनी समाजपयोगी पद्धतीने साजरा केला. त्यांनी प्रभागात विविध विकासकामांचे लोकार्पण सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग 17मधील नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, अॅड. वृषाली वाघमारे आणि प्रभाग समिती अध्यक्ष सुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीमधून केल्या गेलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण शुक्रवारी (दि. 6) सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यात प्रभाग 17मध्ये डस्ट बिन वाटप, सेक्टर 15 एमध्ये ओपन जीमचे उद्घाटन, प्रभाग 17मध्ये बेंच बसविणे आदी कामांचा समावेश होता. प्रकाश बिनेदार यांच्या निधीतून शिवाजी नगरमध्ये सभागृह, वृषाली वाघमारे यांच्या निधीतून इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ बेंच, महिलांसाठी कंटेनरमधील टॉयलेटची सुविधा, मनोज भुजबळ यांच्या निधीतून विश्रामगृह, सुशीला घरत यांनी तेथे गार्डनसाठी निधी दिला आणि चारही नगरसेवकांच्या निधीतून 250 कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले.
या वेळी बोलताना अॅड. मनोज भुजबळ यांनी, आम्ही चौघांनी नगरसेवक झाल्यापासून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या वेळी दिलेली 90 टक्के कामे कोणताही मतभेद न ठेवता पूर्ण केली असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेवक तेजस कांडपिळे, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, हेमंत भुजबळ, प्रशांत फुलपगार, अॅड. जितेंद्र वाघमारे, राकेश भुजबळ, अनिल घरत, अजित लोंढे, श्रीमती गुप्ता, मयूरी उन्नतकर, वैशाली पाटील आदी उपस्थित होते.