Breaking News

घरपोच सेवा द्या; अन्यथा कारवाईचा बडगा उगारणार!; माणगावात पोलिसांची हॉटेल, टपरीवाल्यांना समज

माणगाव : प्रतिनिधी

प्रशासनाने केलेल्या सूचनेप्रमाणे ग्राहकांना घरपोच सेवा द्यावी, दुकानासमोर कोणी ग्राहक आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा माणगाव पोलिसांनी शहरातील हॉटेल, टपरीवाल्यांना दिला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र माणगावात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही गुरुवारी नागरिकांची वर्दळ होती. अनेकजण नियमांचे उल्लंघन करताना दिसत होते. याकडे लक्ष देऊन माणगाव पोलिसांनी शुक्रवार (दि. 16) सकाळपासून बाजारपेठेत फिरून योग्य त्या सूचना केल्या. या वेळी शहरातील काही हॉटेल्स तसेच वडापाव टपरीवाले यांच्या दुकानासमोर  नागरिक चहा पीत उभे असलेले नागरिक पोलिसांना दिसले. त्या वेळी प्रशासनाने केलेल्या सूचनेप्रमाणे ग्राहकांना घरपोच सेवा द्यावी, दुकानासमोर कोणी ग्राहक आढळल्यास कारवाई करण्यात येईल, अशी समज पोलिसांनी हॉटेल मालक आणि टपरीवाल्यांना दिली. तसेच माणगाव बाजारपेठेत विनाकारण फिरण्यार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply