नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने लसीकरण मोहीमेला आणखी वेग दिला आहे. कारण कोरोनाविरोधी लढाईत सर्वात मोठे आणि महत्त्वाचे शस्त्र म्हणजे लस असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. आता लसीच्या मुद्द्यावर आपल्या सर्वांसाठी आयसीएमआरने (आयसीएमआर) चांगली बातमी दिली आहे. यामुळे देशाला कोरोनाच्या या संकटात काहिसा दिलासा मिळाला आहे. कोरोना व्हायरसच्या मल्टीपल व्हेरियंट आणि डबल म्युटेंट स्ट्रेनवर करोनावरील स्वदेशी लस करोनाचा डबल म्युटेंट स्ट्रेन आणि मल्टीपल व्हेरियंटवर भारत बायोटेक आणि आयसीएमआरने विकसित केलेली कोवॅक्सिन लस प्रभावी असल्याचा दावा आयसीएमआरने केला आहे. आयसीएमआरने केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला आहे. आयसीएमआरने यासंदर्भात ट्वीट केले आहे. डअठड-उेत-2 च्या मल्टी व्हेरियंट आणि डबल म्युटेंट स्ट्रेनविरोधात कोवॅक्सिन लस प्रभावी ठरली आहे, असे आयसीएमआरने म्हटले आहे. देशात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना सरकारने लसीकरण मोहीमेवर जोर दिला आहे. अशा स्थितीत ही एक दिलासा देणारी बातमी आहे. कोवॅक्सिन लसीच्या तिसर्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीचे निष्कर्ष आयसीएमआरने जाहीर केले आहेत. कोवॅक्सिन लस क्लिनिकली 78 टक्के प्रभावी आहे. तर करोनाने प्रकृती गंभीर बनलेल्या रुग्णांवर ही लस 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. कंपनीने आपल्या दुसर्या विश्लेषणात कोरोनाच्या 87 लक्षणांवर संशोधन केले होते. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता कंपनीने तिसर्या टप्प्यातील चाचणी 127 लक्षणांवर अभ्यास केला. यात कोरोनावरील कोवॅक्सिन लस ही 78 टक्के प्रभावी असल्याचे समोर आले. कंपनी कोरोनावरील लसीचा फायनल रिपोर्ट जूनमध्ये जारी करणार आहे. तिसर्या टप्प्यातील चाचणीत 18-98 वर्षांतील 25,800 नागरिकांनी लसीच्या चाचणीत सहभाग घेतला. यामध्ये 60 वर्षांवरील अधिक वयाचे 10 टक्के नागरिक सहभागी झाले होते. कोवॅक्सिन ही स्वदेशी लस आहे. केंद्र सरकारची संस्था आयसीएमआर आणि हैदराबादमधील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस विकासित करण्यात आली आहे. येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. या लसीकरणासाठी भारत बायोटेक पुढच्या महिन्यात कोवॅक्सिन लसीचे तीन कोटी डोसचे उत्पादन करणार आहे. मार्चमध्ये कंपनीने 1.5 कोटी डोसचे उत्पादन केले होते. यासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेकला आर्थिक पाठबळही दिले आहे. तसेच उत्पादन वाढवण्याच्या सूचनाही केंद्र सरकारने लस उत्पादक भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटला दिल्या आहेत. भारत बायोटेक बेंगळुरूत नवीन यंत्रणा उभारणार आहे. कंपनीने सुरवातीला एका प्रकल्पाद्वारे उत्पादन सुरू केले होते. आता हैदराबादमध्ये कंपनीने चार प्रकल्प उभारले आहेत. त्यातून लसीचे उत्पादन सुरू आहे. गेल्या महिन्यात आम्ही दीड कोटो डोसचे उत्पादन केले होते. या महिन्यात दोन कोटी डोसचे उत्पादन करणार आहोत. पुढच्या महिन्यात हे लक्ष्य तीन कोटी डोसचे आहे. यानंतर सात ते साडेसात कोटी डोसच्या उत्पादन केले जाईल, अशी माहिती भारत बायोटेकच्या एल्ला यांनी एका कार्यक्रमात दिली.