Breaking News

अनुसूचित जाती मोर्चा संवाद मेळावा उत्साहात

सरकार मागासवर्गीय समाजासोबत -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपला देश आज सन्मानाने, अभिमानाने जगापुढे उभा आहे. या देशातील मागासवर्गीय समाजाला इतर सर्व समाजांच्या बरोबरीने आणण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार काम करत आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार योजना राबवत आहेत, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 20) केले.
भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने कामोठे येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. लाडकी बहीण योजनेने माझ्या भगिनींना ताकद देण्याचे काम केले. म्हणून मी महायुती सरकारचे आभार व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
या मेळाव्याला भाजपचे कोकण संघटन मंत्री सतीश धोंड, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजप कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक अरुणकुमार भगत, विकास घरत, गोपीनाथ भगत, विजय चिपळेकर, दिलीप पाटील, माजी नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, कुसुम म्हात्रे, हेमलता गोवारी, अरुणा भगत, शीला भगत, युवा नेते हॅपी सिंग, महेंद्र भोपी, रवींद्र गोवारी, युवा मोर्चा कामोठे अध्यक्ष तेजस जाधव, सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, अनुसूचित मोर्चाचे शहराध्यक्ष मयूर मोहिते, आरपीआयचे शहराध्यक्ष अ‍ॅड. मंगेश दिवाळ, विनोद खेडकर, प्रदीप भगत, रमेश म्हात्रे, चंद्रकांत कडू, अरुण सोळंकी, श्याम साळवी, अविनाश गायकवाड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी म्हणाले की, पनवेल विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी बौद्ध विहाराचे निर्माण करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून वेळोवेळी मदतीचा हात पुढे आला आहे. अशा नेत्यांच्या पाठीशी समाजाने भक्कमपणे उभे राहिले पाहिजे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने नेहमी अपमान केला आहे. बाबासाहेबांना दोन वेळा लोकसभेला पराभूत करण्याचे काम काँग्रेसने केले. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय काँग्रेस हे जळते घर आहे. त्याच्यासोबत आपण राहता कामा नये, असे सांगून भाजप जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार म्हणाले की, मला अभिमान आहे पनवेल विधानसभा क्षेत्रातील अनुसूचित जातीचा समाज नेहमी भाजप आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहिलाय. कोणताही समाज कोणाच्याही पाठीशी असाच उभा राहत नाही. त्या नेतेमंडळींनी समाजासाठी काम केलेले असते.
आपल्या देशामध्ये 50 वर्ष काँग्रेसचे राज्य होते. त्यांचे काम आपण पाहिले, परंतु गेल्या 10 वर्ष केंद्रात मोदी सरकार काम करून वेगवेगळ्या योजना आपल्या समाजासाठी निर्माण करत आहे. या योजनांच्या माध्यमातून आपल्याला त्याचा फायदा होतोय आणि म्हणूनच आपला समाज भाजपच्या सोबत जोडला गेला आहे, असेही बिनेदार यांनी सांगितले.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवीन नियुक्ती केलेल्या पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांना भीमरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल, तर युवा नेते हॅपी सिंग यांची राज्य अल्पसंख्याक विकास आयोगावर समाजाचे प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Check Also

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघांचे काम प्रेरणादायी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे गौरवोद्गार; वर्धापन दिन उत्साहात पनवेल ः रामप्रहर वृत्त सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी …

Leave a Reply