आशियाई कुस्ती स्पर्धेत पुनियाला सुवर्णपदक
शियान ः वृत्तसंस्था
आशियाई कुस्ती स्पर्धेत कुस्तीपटू बजरंग पुनियाने दमदार कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले आहे. कझाखस्तानच्या सायतबेक ओकासोव्ह याला 12-7 अशा फरकाने पराभूत करीत बजरंगने 65 किलो वजनी गटात सर्वोच्च स्थान मिळवले.
सामना सुरू होताच पहिल्या मिनिटात ओकासोव्ह याने 2-7 अशी दमदार आघाडी घेतली, मात्र त्यानंतर बजरंगने सामन्यात जोरदार पुनरागमन करीत पाठोपाठ आठ गुणांची कमाई करून सामन्यावर मजबूत पकड मिळवली आणि सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. बजरंगचा आक्रमकपणा आणि सामन्यात वापरलेल्या चाणाक्षपणासमोर ओकासोव्हने शरणागती पत्करली. बजरंगने आशियाई कुस्ती स्पर्धेचे दुसर्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे. उझबेकिस्तानच्या सिरोजिद्दीन खासनोव्ह याला 12-1ने पराभूत करत बजरंगने उपांत्य फेरी गाठली होती.