Breaking News

पनवेल मनपाकडून शुक्रवारपासून 40 आयसीयू बेड होणार उपलब्ध

20 व्हेंटिलेटर बेडचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेकडून कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात 200 आयसीयू बेड उपलब्ध करण्यात येणार असून, 1 मेपासून टप्प्याटप्प्याने हे बेड उपलब्ध होणार आहेत. त्या अनुषंगाने सुरुवातीला 40 आयसीयू बेड उपलब्ध होत असून, त्यामध्ये 20 बेडमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा असणार आहे, असे महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सांगितले.
एमजीएम रुग्णालयाचा शुक्रवारी (दि. 30) पाहणी करून आढावा घेताना महापौर डॉ. चौतमोल यांच्यासह उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष शेट्टी, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, निलेश बावीस्कर, वैद्यकीय अधिकारी श्री. गोसावी, महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय व्यवस्थापनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणी करून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन दिले होते, तसेच आवश्यकतेनुसार 200 ऑक्सिजन बेडसाठी साहित्य खरेदीस येणार्‍या खर्चाला पनवेल महापालिकेच्या महासभेत प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात 200 आयसीयू बेड उपलब्ध होणार आहेत.
15मेपर्यंत 200 बेडची उपलब्धता
यामध्ये शनिवारी 1 मे रोजी 40 (यात 20 व्हेंटिलेटर बेड), तर 2 मेपर्यंत 60 आयसीयू बेडची सेवा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर 15 मेपर्यंत उर्वरित 100 आयसीयू बेडची सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यातही 20 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हेल्पलाइनचा वापर करा -परेश ठाकूर
या निर्णयाचा फायदा महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांना होणार आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची बेडसाठी होणारी परवड थांबणार आहे. कोरोनासंबंधित या सेवांचा लाभ घेण्यासाठी भाजपने ‘कोविड-19 मदत’ या नावाने सहाय्य करण्यासाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी कोरोनासंबंधित सर्व प्रकारच्या मदतीकरीता 24द7 कालावधीत दूरध्वनी क्रमांक 8657861741, 8657861742, 8657861743, 8657861744 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply