Breaking News

खांदा कॉलनीत उपमहापौरांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती; सीताताई पाटील यांना शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त

खांदा कॉलनीमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71 व्या वाढदिवसाचे औचित्यसाधून  पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप शिबिराचे तसेच सीताताई पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून डस्टबीन आणि बेंचेसचे वाटप रविवारी (दि. 5) करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत चष्म्यांचे वाटप केले तसेच सीताताई पाटील यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून एस.एन.आय हॉस्पिटलच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबीराचे आयोजन खांदा कॉलनी येथील उपमहापौर सीताताई पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते.

या शिबिराचा लाभ 100हून अधिक नागरिकांनी घेतला. तसेच या वेळी उपमहापौर सीताताई पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून परिसरातील सोसायट्यांना डस्टबीनचे आणि बेंचेसचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी नगरसेवक एकनाथ गायकवाड, भाजप युवा मोर्चाचे खांदा कॉलनी शहर अध्यक्ष अभिषेक भोपी, भाजप नेते भीमराव पवार, ज्येष्ठ नेते सदानंद पाटील, मिथुन दर्गे, चेतन जाधव, संदीप डोंगरे, पवन वाघमारे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply