Breaking News

पालिकेच्या अॅपचा लाभ घ्या

विक्रांत पाटील यांचे आवाहन; उद्योगासाठी तरुणांना संधी

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलमध्ये रेल्वे व महामार्गामुळे वाहतुकीची उत्तम सोय, विमानतळाची सुविधा, नैना प्रकल्प, जवळच असलेल्या जेएनपीटीसारख्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे तरुण उद्योजकांना आपल्या विविध प्रकारच्या उद्योग उभारणीस अनेक संधी उपलब्ध आहेत. पनवेल महापालिकेने मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केले असून तरुणांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी शनिवारी (दि. 16) केले. पनवेल महानगरपालिकेने दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहर उपजीविका केंद्राची वेबसाईट व मोबाइल अ‍ॅप्लिकेशन सुरू केले असून, त्याचा प्रसार व प्रसिद्धीसाठी बचत गट व व्यावसायिक संमेलनाचे आयोजन येथील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. या वेळी उपमहापौर विक्रांत पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला महिलाव बालकल्याण सभापती लिना गरड, प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी, उपायुक्त जमीर लेंगरेकर, संजय शिंदे, नगरसेविका कुसुम म्हात्रे, कुसुम पाटील, हेमलता म्हात्रे, बिझनेस कोचचे डॉ. संतोष कामेरकर, विनोद मिस्त्री, अल्ट्रुस्टीक बिझनेस क्लबचे अध्यक्ष विजय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. सहाय्यक आयुक्त तेजस्विनी गलांडे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला महापालिका क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिक, बचत गट, सामाजिक संस्था यांचे प्रतिनिधी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply