Breaking News

ग्रामीण भागातील कोरोना फैलाव रोखण्यासाठी नवी नियमावली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

देशात कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता शहरांसोबत ग्रामीण भागातही वाढताना दिसत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता शहरांसोबत ग्रामीण भागात कोरोना फैलाव रोखण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमावलीत देखभाल, स्क्रिनिंग आणि आयसोलेशनवर भर देण्यात आला आहे. आशा कार्यकर्त्यांना यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य अधिकारी आणि एएनएमला रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात आणि उपकेंद्रात हे टेस्ट किट उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रत्येक गावागावात जाऊन आशा कार्यकर्त्यांना सर्दी-तापाची नोंद करावी लागणार आहे. त्यांच्यासोबत सॅनिटायझेशन व न्यूट्रिशन कमिटीही सोबत असेल. ज्या नागरिकांत कोरोनाची लक्षणे आढळून येतील, त्यांना आरोग्य अधिकार्‍यांकडून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना टेस्ट झाल्यानंतर त्यांनी आयसोलेशनमध्येे राहण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. रिपोर्ट येईपर्यंत आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. अशा रुग्णांत गंभीर लक्षण दिसल्यास  तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply