Breaking News

विनाकारण फिरणारे 295 जण कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल : वार्ताहर

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीदेखील रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍यांची संख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीये. शेवटी पोलीस प्रशासन व पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या मदतीने पनवेल महापालिका हद्दीत विनाकारण फिरणारे, भाजीविक्रेते व फळविक्रेते यांची रॅपिड अँटीजन व आरटीपीसीआर तपासणी सुरू केली आहे. यामध्ये तब्बल 295 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सुपर स्प्रेडर ठरणार्‍यांना पोलिसांनी इंडिया बुल्स या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने 1 जूनपर्यंत संचारबंदी लॉकडाउन लागू केलेला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सुविधा बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्याचबरोबर संचारबंदी काळात विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे, तरीही अनेक नागरिकांची शहरात भटकंती सुरूच आहे. त्यामुळे विनाकारण फिरणार्‍यांना अडवून त्यांची रॅपिड अँटीजेन व आरटी-पीसीआर चाचणी करण्याचा उपाय पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशानुसार आरोग्य विभाग पथक तसेच पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर, पनवेल तालुका, खांदेश्वर, कामोठे, कळंबोली, तळोजा, आणि उरण पोलीस ठाणे अतंर्गत ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.

या नाकाबंदीमध्ये दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच रस्त्यावर रिकामटेकडे भटकणार्‍यांची थेट रस्त्यावरच अँटीजेन व आरटीपीसीआर तपासणी करण्याची मोहीम सुरू केली आहे. शिवाय पनवेल महानगरपालिका, आरोग्य विभाग यांची टीमही या कामी पोलिसांची मदत करीत आहे. संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले, परंतु अनेक नागरिक विशेषत: युवक मोकाट रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोकाट फिरणार्‍यांची अँटिजेन तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर भाजी मार्केट येथील भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांची अँटीजेन व आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यामध्ये 295 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यांना इंडिया बुल्स कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Check Also

शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिराच्या पोलीस कोठडीत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल तक्का …

Leave a Reply