Breaking News

पांड्याने मोडला पंतचा विक्रम

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या मुकाबल्यात जोरदार फटकेबाजी पाहावयास मिळाली. या सामन्यात कोलकाताच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या हार्दिक पांड्याने जोरदार फटकेबाजी केली. झुंजार खेळी करून तो माघारी परतला, पण यात त्याने एक विक्रम केला.

कोलकात्याने 2 बाद 232 धावांचा डोंगर उभा केला आणि मुंबईला 233 धावांचे आव्हान दिले. या सामन्यात रसेलने तुफान फटकेबाजी केली. त्याने 40 चेंडूंत नाबाद 80 धावा ठोकल्या. त्याच्या खेळीच्या तोडीस तोड तोड खेळी मुंबईच्या हार्दिक पांड्याने केली. तुफान फटकेबाजीच्या जोरावर पांड्याने 34 चेंडूंत 91 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 9 षटकार यांचा समावेश होता. फटकेबाजीच्या प्रयत्नात तो बाद झाला.

पांड्याने 17 चेंडूंत तुफानी अर्धशतक ठोकले. त्यामुळे सामन्यात रंगत वाढली. त्याचे हे अर्धशतक यंदाच्या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक ठरले. पांड्याने ऋषभ पंत याचा विक्रम मोडला. पंतने मुंबईविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 18 चेंडूंत अर्धशतक ठोकले होते. हा विक्रम पांड्याने मोडीत काढला.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply