Breaking News

नगरसेवक राजू सोनी यांच्या प्रयत्नाने पनवेलमध्ये वीजपुरवठा सुरळीत

पनवेल : वार्ताहर

गेल्या दोन दिवसापूर्वी तौक्ते चक्रीवादळाचा फटका पनवेल शहराला मोठ्या प्रमाणात बसला. या वेळी शहरातील मिरची गल्ली, मिडल क्लास हौसिंग सोसायटी, भुसार मोहल्ला, कोळीवाडा, पंचरत्न हॉटेल परिसर, रोहिदास वाडा आदी भागातील रहिवाशांना बसून मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. याबाबतची माहिती कार्यसम्राट नगरसेवक राजू सोनी यांना मिळताच त्यांनी तातडीने वीज वितरण कंपनी व पनवेल महापालिका यांच्या सहकार्याने दोन दिवस सातत्याने उभे राहून पाठपुरावा तेथील वीज पुरवठा सुरळीत करून घेतला.

तौक्ते चक्रीवादळाच्या फटक्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडीत झाला होता. याची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना मिळताच तातडीने ते त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी नानोटे, चौधरी, महाडिक तसेच पनवेल महानगरपालिकेचे प्रितम पाटील, अग्नीशमन दलाचे अधिकारी जाधव यांना त्या ठिकाणी पाचारण केले व वाढलेली झाडे, झुडूपे तसेच तुटलेल्या विद्युतलाइन, ब्रेकर आदी काम स्वतः उभे राहून करून घेतले आहे. त्याचप्रमाणे झाडे तोडण्यासाठी लागणारी बकेट गाडी महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध केली. त्याचप्रमाणे अग्नीशमन दलाच्या गाड्या त्या ठिकाणी आणून झाडे व तुटलेल्या फांद्या, अडकलेल्या विद्युत लाईनवरील फांद्या मोकळ्या करून घेतल्या. तसेच तातडीने रोहिदास वाडा येथे दोन नवीन विद्युत पोल वीज वितरण कंपनीच्या सहकार्याने स्वःखर्चाने इतर साहित्य आणून उभारून दिले. या त्यांच्या कार्याचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply