मुंबई ः प्रतिनिधी
इंडियन आयडल-12 या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायणने नुकताच प्रसारित झालेल्या भागामध्ये अलिबागवरून वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्याच्यावर टीका सुरू झाली होती. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेने उडी घेतल्याने या वादाला गंभीर वळण लागले होते. एकूण या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आदित्य नारायण याने सोशल मीडियावरून माफीनामा प्रसिद्ध केला आहे.
इंडियन आयडल-12 कार्यक्रमाच्या अलिकडेच प्रसारित झालेल्या भागात आदित्यने एका स्पर्धकाचे गाणे संपल्यावर आदित्यने त्याला ’रागदारीचा नीट अभ्यास करून येत जा… आम्ही काय अलिबागवरून येथे आलो आहोत का?’ असे सुनावले. प्रेक्षकांना ही गोष्ट खूपच खटकली होती.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …