पनवेल ः प्रतिनिधी
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय मराठी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातर्फे वेशभूषा, चित्रकला व पोस्टर मेकिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
यात पूर्व प्राथमिक विभागात वेशभूूषा स्पर्धा (पाणी वाचवा, मुलगी वाचवा, कोविड, कोविड योद्धे) यामध्ये नर्सरी प्रथम क्रमांक चि. रिद्धांत सागर घरत, लिटिल चॅम्प्स इंग्रजी माध्यम, ओवळे, द्वितीय क्रमांक कु. अवनी योगेश शेवाळे, सीकेटी विद्यालय, इंग्रजी माध्यम, नवीन पनवेल, तृतीय क्रमांक कु. राज्ञयी रोहित तांबोळी, सीकेटी विद्यालय, इंग्रजी माध्यम, नवीन पनवेल, तर उत्तेजनार्थ क्रमांक चि. दुष्यंत गणेश यादव, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, गव्हाण यांना मिळाला.
तसेच ज्युनियर केजी प्रथम क्रमांक कु. रूद्रा राजेंद्रकुमार ठाकूर, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, गव्हाण, द्वितीय क्रमांक चि. हर्षद अजित रांबाडे, सीकेटी विद्यालय, इंग्रजी माध्यम, नवीन पनवेल, तृतीय क्रमांक चि. अथर्व जिवबा पोवार, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, गव्हाण, तर उत्तेजनार्थ क्रमांक कु. अनन्या नारायण ठाकूर, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, गव्हाण यांना मिळाला.
सीनियर केजी प्रथम क्रमांक चि. पल्लव आशिष म्हात्रे, सीकेटी विद्यालय, इंग्रजी माध्यम, नवीन पनवेल, द्वितीय क्रमांक चि. वेद विकास मरगजे, सीकेटी विद्यालय, इंग्रजी माध्यम, नवीन पनवेल, तृतीय क्रमांक चि. विहान मिलिंद वासकर, सेंट विल्फ्रेड स्कूल, तर उत्तेजनार्थ कु. स्पृहा सुयोग हमने, सीकेटी विद्यालय, इंग्रजी माध्यम, नवीन पनवेल यांना मिळाला.
त्याचप्रमाणे प्राथमिक विभाग चित्रकला (फुलपाखरू, माझे सुंदर घर, वाढदिवस समारंभ, कार्टून) यामध्ये इयत्ता पहिली व दुसरी प्रथम क्रमांक कु. प्रगती महेश पाटील, बीसीटी विद्यालय, द्रोणागिरी, द्वितीय क्रमांक कु. निहांता अमित कदम, शांती निकेतन स्कूल, नवीन पनवेल, तृतीय क्रमांक कु. श्रेया अमर थळे, सीकेटी विद्यालय, इंग्रजी माध्यम, नवीन पनवेल, तर उत्तेजनार्थ क्रमांक कु. मधुरा शीतलकुमार कांबळे, आरटीपीएस, खारघर, उत्तेजनार्थ चि. आदित्य नितीन माने, सुधागड एज्युकेशन सोसायटी, नवीन पनवेल यांना मिळाला.
इयत्ता तिसरी व चौथी प्रथम क्रमांक चि. उद्दीपन बिश्वास, आरटीपीएस, खारघर, द्वितीय क्रमांक चि. कैवल्य बी. पाटील, सीकेटी विद्यालय, इंग्रजी माध्यम, नवीन पनवेल, तृतीय क्रमांक कु. आयुषी सचिन कापसे, सीकेटी विद्यालय, इंग्रजी माध्यम, नवीन पनवेल, तर उत्तेजनार्थ क्रमांक कु. संस्कृती अलंकार घरत, बीसीटी विद्यालय, द्रोणागिरी, उत्तेजनार्थ कु. उपासना बिश्वास, आरटीपीएस खारघर यांना मिळाला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, सचिव एस. टी. गडदे, संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला कोटियन, इंग्रजी पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका संध्या अय्यर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पनवेल तालुक्यातील विविध इंग्रजी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी कोविड महामारी व लॉकडाऊनसारख्या कठीण काळातही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.