Breaking News

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे राहुल गांधी

भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत शेतकर्‍यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे असा टोला लगावला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे हे विधान भारतीय सैन्यांचे अपमान करणारे असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे. त्यावरून भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी आहेत, असे ट्विट करीत टीका केली आहे.

भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना राहुल गांधींवरही निशाणा साधला अशून उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत असा टोला लगावला आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, चीनसमोर पळ काढे असे निलाजरं विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भारतीय सैनिकांचा अपमान केला. उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत. जवानांचा अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणीदेखील अतुल भातखळकर यांनी केली आहे. जनता या ‘राहुल गांधीगिरी’चा समाचार घेईलच असेही ते म्हणाले आहेत.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply