Breaking News

भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 76मधील इच्छुक उमेदवार व समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व मोफत आरोग्य शिबिर हे दोन्ही कार्यक्रम रविवारी (दि. 31) उत्साहात झाले.

भाजपचे पांडुरंग आमले यांनी सानपाडा सेक्टर 3 येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात विभागातील 350हून अधिक रहिवासी सहभागी झाले होते. आरोग्य शिबिरात रहिवाशांची नेत्रचिकित्सा, मोफत चष्मावाटप, मधुमेह तपासणी, इसीजी तपासणी करण्यात आली. 170 लोकांना या वेळी मोफत चष्मे देण्यात आले.

सायंकाळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत व युवा नेते तसेच जिल्हा महामंत्री निलेश म्हात्रे यांच्या हस्ते भाजपच्या सानपाडा सेक्टर 3 येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी जिल्हा युवा अध्यक्ष दत्ता घंगाळे, जिल्हा उपाध्यक्ष आबा जगताप, महामंत्री विजय घाटे, राजेश रॉय, भाजप मंडळ अध्यक्ष श्रीमंत जगताप, देवनाथ म्हात्रे, नगरसेवक गिरीश म्हात्रे, शेखर भोपी, सुनीला कुरकुटे, प्रभाग 74च्या भाजपच्या शैला पाटील उपस्थित होत्या.

 कार्यक्रमात रामचंद्र घरत, निलेश म्हात्रे, दत्ता घंगाळे, श्रीमंत जगताप यांनी समयोचित भाषणे करताना पांडुरंग आमले यांच्या जनसेवेचा आढावा घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी महिला मोर्चा सानपाडा अध्यक्ष आज्ञा गव्हाणे, उपाध्यक्ष नीता आंग्रे, मंगल वाव्हळ, सुलोचना निंबाळकर, संचिता जोएल, प्रतिभा पवार, शारदा आमले, दिशा केणी, तन्वी सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष जयश्री दंडवते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शेटे यांनी, तर आभार श्रीमंत जगताप यांनी मानले. कार्यक्रमात प्रास्तविकपर भाषण करताना पांडुरंग आमले यांनी हे जनसंपर्क कार्यालय 24 तास जनतेसाठी सुरू राहणार असल्याचे या वेळी सांगितले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply