Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी अन्नधान्याचे वाटप

पनवेल ः वार्ताहर

कोरोना महामारीमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या दानतीचे व माणुसकीचे दर्शन देताना मागील वर्षात लाखो जणांना मदतीचा हात दिला. या वर्षीदेखील लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने पनवेल तालुका व महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप केले जात आहे.

या उपक्रमांतर्गत मोहोचा पाडा, पाली, वांगणी, वांगणी वाडी, लोणिवली येथे गरजू नागरिकांना सोमवारी (दि. 24) अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, वांगणी विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, विचुंबे पंचायत समिती अध्यक्ष सतीश मालुसरे, वांगणीची वाडीच्या सरपंच सुरेखा अशोक पवार, सदस्य संतोष शेळके, शक्ती केंद्रप्रमुख प्रमोद म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, महेंद्र भोईर, प्रवीण पालव, गुरुनाथ भोईर, अनिष मालुसरे, संतोष पाटील, मयूर घरत, गणेश पाटील, संतोष घरत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply