Breaking News

पेण न. पा.ला हागणदारीमुक्त शहराचे मिळाले नामांकन; केंद्र सरकारच्या परीक्षण पथकाचा अहवाल

पेण : प्रतिनिधी

पन्नास हजारांहून जास्त लोकसंख्या असलेल्या पेण शहराला केंद्र सरकारकडून हागणदारीमुक्त नामांकन प्राप्त झाले आहे. या सांघिक कामगिरीबद्दल नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2021 अंतर्गत केंद्र सरकारच्या अधिकार्‍यांचे परीक्षण पथक एप्रिलअखेर पेण शहराचे पहाणी करून गेले. एमएमआरडीए मार्फत बांधलेली शहरातील 17 सार्वजनिक शौचालये, खासगी व वैयक्तिक शौचालये, शौचालय स्वच्छता, उपलब्ध पाण्याचा वापर आणि साठवणूक, निर्जंतुकीकरण,  प्रकाश व्यवस्था याची पाहणी परीक्षण पथकातील सदस्यांनी केली. आणि परीक्षण पूर्ण झाल्यानंतर 3 मे 2021 रोजी पेणला हागणदारीमुक्त शहर नामांकन घोषित केले.

नागरिकांचे सहकार्य आणि नगर परिषद कर्मचार्‍यांची कार्यतत्परता यामुळे पेणला पुन्हा एकदा हागणदारीमुक्त शहर नामांकन प्राप्त झाले आहे. त्याबद्दल नागरिक, अधिकारी, कर्मचार्‍यांचे अभिनंदन.

– प्रीतम पाटील, नगराध्यक्ष, पेण

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply