Breaking News

मोदी सरकारच्या यशस्वी सात वर्षांनिमित्त अमित शाहांच्या भावना

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी  (एनडीए) सरकारला केंद्रात सत्तेत दुसर्‍यांदा येऊन दोन, तर एकून सात वर्षे पूर्ण झाली आहेत. 30 मे 2014 रोजी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. केंद्रातील सत्तेत सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा देण्याचा प्रयत्न होत असून, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीदेखील ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटमध्ये सरकारच्या एकूण कामगिरीबद्दल मत व्यक्त केले आहे. मागील सात वर्षांत देशातील जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या सेवा आणि सर्मपणावर विश्वास दाखवला आहे. यासाठी मी देशवासीयांना नमन करतो. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक संकटावर विजय मिळवून भारताच्या विकासाचा गाडा अखंडितपणे पुढे घेऊन जाऊ, याचा मला पूर्ण विश्वास आहे, असे शाह यांनी म्हटले आहे. या सात वर्षांमध्ये मोदीजींनी देशहिताला सर्वोच्च मानून दृढनिश्चय आणि सर्वांसाठी आणि कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरीब, शेतकरी आणि वंचित वर्गांना विकासाच्या मुख्य धारेशी जोडले. त्यांचे जीवनमान उंचावले. त्याचबरोबर आपल्या सशक्त नेतृत्वाच्या बळावर भारताला एक मजबूत राष्ट्र बनवले, असेही शाह यांनी नमूद केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. ‘सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन आणि एनडीए परिवाराला शुभेच्छा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आजचा दिवस सेवा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. भाजपचे कोट्यवधी कार्यकर्ते आज एक लाख गावांमध्ये आपली सेवा देणार आहे,’ असे नड्डा यांनी म्हटले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply