Breaking News

जीवनावश्यक वस्तूंचे गरजूंना मोफत वाटप; मोदी सरकारची सप्तवर्षपूर्ती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला केंद्रात सत्तेत दुसर्‍यांदा येऊन दोन, तर एकून सलग सात वर्षे पूर्ण झाली आहेत. 30 मे 2014 रोजी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. यानिमित्ताने भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी  (दि. 30) खारघरमध्ये गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, रामजी बेरा, खारघर मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष रमेश खडकर, अनिल साबणे, विनय पाटील, मोनीष ठाकूर, सुकन्या खुडे, विजयालक्ष्मी राव, सचिन केदार, कमलेश मिश्रा, दीपक खुडे, सचिन मुंडे, विनोद दाभोळकर, बबलू मेहरोलिया, श्री. भानत, भरत मुंडे, आदेश भोईर, राजू विरेकर, आनंद कांबळे, नंदकुमार मोरे, कैलास क्षीरसागर, प्रशांत कवडे, विश्वनाथ मांगोरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी खारघर सेक्टर 12 एफ ब्लॉकमधील अष्टविनायक सोसायटी, यशोधन, मंगलमूर्ती, ओमकार, एकता, हिमालय, सत्यम, सिद्धिविनायक, शिवम, साईकृपा अशा 10 सोसायट्यांतील सुमारे 250 घरांमध्ये जीवनावश्यक वस्तू अंतर्गत धान्यवाटप करण्यात आले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply