पनवेल : वार्ताहर
मराठा क्रांती मोर्चाची मुक आंदोलनाच्या नियोजनासंदर्भात पनवेल येथील व्ही. के. हायस्कूल या ठिकाणी येत्या 18 जूनला सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र मूक आंदोलन छत्रपती संभाजी राजेंनी 16 जूनपासून कोल्हापूर येथून आंदोलनाला सुरुवात करत आहेत. त्यानंतर नाशिक, संभाजीनगर, अमरावती आणि रायगडची 28 जून तारीख दिली आहे. असे पहिल्या टप्प्यात आंदोलने होणार आहे. रायगडची तयारी करण्यासाठी 18 जूनला जिल्ह्याची बैठक घ्यायची आहे तरी सर्व तालुक्यातील चार ते पाच समन्वयक मिटिंगला येणे आवश्यक असल्याचे विनोद सदाशिव साबळे, सुनील पाटील, गणेश कडू, राजेश लाड, शंकर पवार, प्रदीप देशमुख, हरीश बेकावडे, रुपेश कदम, अविनाश पाटील, संतोष पवार, शरद गोळे, अनिल भोसले, शशिकांत मोरे, नरेश सावंत, चेतन सुर्वे, कमलाकर लबडे, संजोग मानकर, संतोष साप्ते, वाय. सी. जाधव यांनी सांगितले आहे.