सर्वत्र पाणी साचल्याने नागरिक चिंतेत
मुरूड : प्रतिनिधी
मुरूडमध्ये शनिवारी सायंकाळपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली असून रविवारीही संततधार सुरू होती. रस्ते, बागायतींमध्ये सर्वत्र पाणी साचले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मागील अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन आधीच खूप नुकसान झाले आहे असाच पाऊस सुष् राहिला तर करायचे काय या विवंचनेत सर्व नागरिक व शेतकरी आहेत. शनिवारी एका दिवसाची पाऊसाची नोंद 136 मीमी झाली असून आतापर्यंत 2293 मीमी पाऊसाची नोंद झाली आहे.
मागील अतिवृष्टीमध्ये पाण्याच्या लोंढ्याने कोसळलेल्या पुलाचे काम प्रगतीपथावर असून खालील चार पाईपचे लेईंग झाले आहे. वरील पाइपच्या लेईंगचे काम जोरात सुरू असून या अचानक सुरू झालेल्या पाऊसाने त्यामध्ये अडथळे येत आहेत.
मुरूडचे तहसीलदार गमन गावित व नगरपालिका प्रशासन आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत, सध्या घराबाहेर कोणी पडू नये, असे आवाहन आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातर्फे सांगण्यात आले आहे.