Breaking News

कोरोना काळातील मृत पोलीस पाटलांच्या कुटूंबीयांना मदत

खालापूर, मोहोपाडा : प्रतिनिधी

खालापूर तालुका पोलीस पाटील संघ व पोलीस ठाण्याच्या वतीने कोरोना काळात मृत झालेल्या पोलीस पाटलांच्या ढेकू येथील सम्राट सुर्वे यांच्या कुटुंबाला एक लाखाचा चेक देण्यात आला.

खालापूर तालुका पोलीस पाटील संघाची सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 17) सकाळी 11 वाजता खालापूर पोलीस ठाण्यात खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

या वेळी कोरोना व इतर कारणामुळे शहीद झालेल्या पोलीस पाटीलांना श्रध्दांजली वाहून कोरोनामुळे शहीद झालेल्या पोलिस पाटलांच्या कुटुंबियाना सांत्वनपर अर्थिक मदत करण्यात आली.

या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक अनिल विभूते, पोलीस पाटील संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव कमलाकर मांगळे, रायगड जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र दुदसकर, जिल्हा सचिव विकास पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष मिलिंद पोपटे, उपाध्यक्ष संतोष गायकर, खालापूर तालुका अध्यक्ष अनंत ठोंबरे, माजी अध्यक्ष राजू केदारी, सचिव पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply