Breaking News

रोहा ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात

रोहे : प्रतिनिधी

महापुराने महाडमधील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या रोहा शाखेच्या पथकाने महाड येथे जाऊन पुरग्रस्तांना पाणी, बिस्किटे, धान्याचे वाटप केले.  पुरामुळे महाडमधील नागरिकांच्या घरातील कपड्यांसह जीवनावश्यक व संसारोपयोगी सर्व साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी रोह्यातील अनेक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश मगर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका सरचिटणीस महादेव सरसंबे, धाटाव विभाग सरचिटणीस लक्ष्मण मोरे, रोठखुर्द ग्रामपंचायत सदस्य जनार्दन मोरे, आगरी समाज विभाग अध्यक्ष हरिचंद्र मोरे, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष किशोर मोरे, ओबीसी युवा नेते वैभव घाणेकर, मोरेश्वर खरीवले, चंद्रकांत भगत यांच्या पथकाने महाडमध्ये विविध ठिकाणी जाऊन तेथील पूरग्रस्तांना पाणी, बिस्किटे, धान्याचे वाटप केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply