Breaking News

विविध संस्थांच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात

पेण मुस्लिम समाजाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

पेण : प्रतिनिधी

महाडमधील पूरग्रस्त व दरडग्रस्त भागातील नागरिकांना अनेक ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरू झाला असून, पेणमधील मुस्लिम समाजानेही या आपद्ग्रस्तांना मदत पाठविली आहे. महाडमधील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन पेण मुस्लिम समाजाच्या वतीने मुफ्ती मुबीन खान यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत पेणमधील मुस्लिम समाजाने किराणा सामानासह, चटई, पिण्याचे पाणी व जीवनावश्यक वस्तू गोळा केल्या. पेण मुस्लिम समाजाचे हबीब खोत, मुफ्ती मुबीन खान, शब्बीर खान, समीर घासे, तजिम मुकादम, समीर खान, रफिक झटाम, सलमान किरकिरे, सलमान बुबेरे, रफिक खोत, खालिद खोत, सईद नाईक, शहाब खान, जफर मुकादम, जिशान खोत आदींनी महाड येथे जाऊन आपद्ग्रस्तांना या अन्नधान्याचे वाटप केले.

अष्टविनायक मित्र मंडळाची दरडग्रस्तांना मदत; पेण नगरपालिकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील यांचा पुढकार

पेण : येथील अष्टविनायक मित्र मंडळ व पेण नगरपालिकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी महाड येथे जावून दरडग्रस्त 500 कुटुंबांना अन्नधान्य व विविध गरजेच्या वस्तूंचे   वाटप केले. अतिवृष्टीमुळे तळीये, केवनाळे, साखर सुतारवाडी येथे दरडी कोसळल्या. स्थानिक व प्रशासनाकडून तेथे जोरदार बचावकार्य सुरू आहे. दरडग्रस्त व पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद देत पेण येथील अष्टविनायक मित्र मंडळाचे कार्यकर्ते व नगरपालिकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी महाड तळीये, केवनाळे, साखर सुतारवाडी येथील 500 पूरग्रस्त, तसेच दरडग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य व विविध गरजेच्या वस्तू, ब्लॅकेट, कपडे आदी साहित्याचे घटनास्थळी जाऊन वाटप केले. पेण नगरपालिकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील, सभापती राजेश म्हात्रे, माजी नगरसेवक प्रशांत ओक, कपिल दांडेकर, संदीप पाटील, अमित झिंजे, अभिषेक देशपांडे, अमित पोटे, मयूर दांडेकर, प्रसाद म्हात्रे, कौस्तुभ भिडे, शिवाजी चव्हाण, सुभाष आवास्कर आदी उपस्थित होते.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply