Breaking News

ग्रामपंचायत निवडणुक : पनवेलमध्ये भाजप, मित्रपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पनवेल तालुक्यातील भाजप व मित्रपक्षांच्या थेट सरपंचपद आणि सदस्यपदाच्या उमेदवारांनी शुक्रवारी (दि. 2) पंचायत समिती कार्यालयात अर्ज दाखल केले. या अर्जांची छाननी येत्या सोमवारी (दि. 5) होणार आहे.
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. या अंतर्गत पनवेल तालुक्यात 10 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप आणि युतीच्या उमेदवारांनी इच्छुकांनी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत व उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या सहकार्याने आपले उमेदवारी अर्ज सादर केले.
थेट सरपंचपदासाठी शिवकर ग्रामपंचायतीमधून आनंद ढवळे, शिरढोणमधून प्रगती मुकादम, भाताणमधून तानाजी पाटील, करंजाडेतून मंगेश शेलार, कानपोलीमधून बाळकृष्ण पाटील, नेरेमधून प्रकाश घाडगे, नितळजमधून शरद पावसे, दिघाटीतून रजनी ठाकूर, केळवणेमधून सुशील ठाकूर यांच्यासह सदस्यपदासाठी भाजप युतीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
अर्ज भरतेवेळी भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, विनोद साबळे, माजी पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, महापालिकेचे माजी सभापती मनोहर म्हात्रे, बबन मुकादम, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा नेते दशरथ म्हात्रे, विनोद पाटील, दिनेश खानावकर, माजी सरपंच दत्तात्रेय ढवळे, माजी सरपंच अमित पाटील, भारती पाटील, गोटीराम ढवळे, चंद्रकांत ढवळे, तुकाराम टोपले, भास्कर पाटील, हिराजी वाजेकर, माजी उपसरपंच रोहित घरत, प्रकाश खैरे, प्रदीप मते, कल्पेश खानावकर, गीता जोशी, मंजुळा पाटील, बामा उघडा, नंदा पारधी, छबी चौधरी, संगीता गवते, शैलेश जाधव, विनायक चोरगे, नीलिमा पाटील, राम पाटील, दिनेश मानकामे, वंदना रोटपालकर, योगिता दुर्गे, रसिका भोईर, विजय ठाकूर, नितेश भोईर, रजनी मुकादम, मारुती सते, प्रमिला झुमारे यांच्यासह भाजप व युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दाखल झालेल्या अर्जांची छाननी 5 डिसेंबरला होणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर असून त्याच दिवशी चिन्ह वाटप होणार आहे. त्यानंतर प्रचाराला खर्‍या अर्थाने वेग येणार आहे. या निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान आणि 20 डिसेंबरला मतमोजणी व निकाल आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply