Breaking News

सायबर गुन्हेगाराकडून नेव्हल ऑफिसरच्या पत्नीला गंडा

पनवेल : वार्ताहर

ऑनलाइन आयफोन विकत घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या उरणमधील नेव्हल ऑफिसरच्या पत्नीला सायबर गुन्हेगारांच्या टोळीने 30 हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकिस आले आहे. मोरा सागरी पोलिसांनी या प्रकणातील सायबर गुन्हेगारांवर फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेली महिला नेव्हल ऑफीसरची पत्नी असून ती पती व मुलासह करंजा येथील नेव्हीनगर येथे राहण्यास आहे. या महिलेला आयफोन विकत घ्यायचा असल्याने तिने गत महिन्यामध्ये गुगलवर त्याचा शोध घेतला होता, तसेच आपला मोबाईल फोन नंबर त्यात टाकला होता. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने युके स्कॉटलँड देशातील डॉ. अ‍ॅलेक्स असल्याचे सांगून या महिलेला इन्स्टाग्रामवर संपर्क साधला होता. तिला हव्या असलेल्या आयफोनचे डिटेल्स देण्यासाठी तिच्याकडे व्हॉट्सअ‍ॅप नंबर मागून घेतला होता. त्यानंतर भामट्या अ‍ॅलेक्सने या महिलेच्या व्हॉटसअ‍ॅपवर आयफोनची किंमत एक लाख ते 80 हजारपर्यंत असल्याचे सांगून तिला आयफोनच्या पार्सलचा फोटो पाठवून दिला. या पार्सलसोबत घड्याळ किंवा परफ्युम गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर विविध कारणे सांगून महिलकडून भामट्याने लाखो रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने मोरा सागरी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply